14 पिकांची एमएसपी वाढवली


खरीप हंगामासाठी केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली
केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीला एमएसपी मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.एमएसपी वाढवण्याचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगली किंमत देणे आणि कृषी क्षेत्राला अधिक फायदेशीर बनवणे हा आहे. एमएसपी ही केंद्र सरकारने निश्चित केलेली किमान किंमत आहे. यावर सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची हमी देते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, ‘शेतकऱ्यांच्या हितासाठी आज मंत्रिमंडळात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने खरीप पिकांसाठी 14 पिकांसाठी एमएसपी मंजूर केला आहे. धानाचा नवीन एमएसपी 2,300 रुपये करण्यात आला आहे, जो मागील एमएसपीपेक्षा 117 रुपये अधिक आहे. कापसाचा नवीन एमएसपी 7,121 रुपये आणि दुसऱ्या जातीसाठी 7,521 रुपये एमएसपी मंजूर करण्यात आला आहे, जो मागील एमएसपीपेक्षा 501 रुपये अधिक आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!