अमेरिकेतील आणखी एक बँक बंद


रिपब्लिक फर्स्ट बँक बंद पडल्याने बँकिंग संकट गडद
वॉशिंग्टन
नव्या आर्थिक वर्षात अमेरिकेत पुन्हा एकदा बँकिंग संकट अधिक गडद होत आहे आणि रिपब्लिक फर्स्ट बँक याचे ताजे उदाहरण ठरले आहे. ही पहिली बँक दिवाळखोरीत निघाली आहे. अहवालानुसार, फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने सर्व त्रुटींवर प्रकाश टाकल्यानंतर बँक बंद करण्यात आली.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्या प्रकारे व्याजदर वाढवले ​​होते त्यामुळे बँकांची अवस्था बिकट झाली असून गेल्या वर्षी देशात पाच बँका दिवाळखोरीत निघाल्या. तर २०२२ मध्ये अमेरिकन बँकांना ६२० अब्ज डॉलर्सचा तोटा झाला. रिपब्लिक फर्स्ट बँकेच्या अपयशानंतर आता फुल्टन बँकेने या बँकेचा ताबा घेतला नियामकांनी रिपब्लिक फर्स्ट बँकेचा ताबा घेतला आणि फुल्टन बँकेला विकला असल्याची फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (FDIC) शुक्रवारी माहिती दिली. गेल्या वर्षी प्रादेशिक बँकिंग संकटामुळे अमेरिकेतील पाच बँका दिवाळखोर झाल्या तर, तेव्हापासून अनेक प्रादेशिक बँकांवर दबाव दिसून आला आणि रिपब्लिक फर्स्ट बँक ऑफ फिलाडेल्फिया पहिला बळी बनला.
आता रिपब्लिक बँकेचे सर्व ठेवी फुल्टन बँक आपल्या ताब्यात घेईल आणि सर्व मालमत्ता खरेदी करेल. ३१ जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार रिपब्लिक बँकेची एकूण मालमत्ता सहा अब्ज डॉलर्स आणि ठेवी चार अब्ज डॉलर्स होत्या. न्यू जर्सी, पेनसिल्व्हेनिया आणि न्यूयॉर्कमधील बँकेच्या ३२ शाखा फुल्टन बँक शाखा म्हणून उघडतील.
या वर्षात कोसळणारी ही अमेरिकेतील पहिली बँक असून बँक बंद झाल्यानंतर पेनसिल्व्हेनिया डिपार्टमेंट ऑफ बँकिंग आणि सिक्युरिटीजने एफडीआयसीला रिसीव्हर म्हणून नियुक्त केले. पण गेल्या वर्षीच्या प्रादेशिक बँकिंग संकटाच्या तुलनेत रिपब्लिक बँक संकट खूपच लहान आहे. रिपब्लिक बँकेत पैसे जमा केलेले लोक फुल्टन बँकेचे ग्राहक होतील.अमेरिकेतील बँकांच्या घाबघाईमागे अनेक कारणे आहेत, पण मालमत्तेवर घेतलेल्या थकीत कर्जाच्या मूल्यात सातत्याने होणारी घट त्यापैकी सर्वात मोठे कारण आहे. वाढीव व्याजदर आणि व्यावसायिक रिअल इस्टेटच्या मूल्यात घट झाल्यामुळे अनेक प्रादेशिक आणि सामुदायिक बँकांसाठी आर्थिक जोखीम वाढली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!