कलाअविष्कारातून जीवनाला नवी दिशा मिळते: सिद्धेश्वर कदम
गौरीशंकर कॉलेज ऑफ फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
सातारा
कलाविष्कारातून घडणारे संस्कार विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्यासाठी पूरक ठरते असे मत सातारा मेङिस्प्रेचे युनिट प्रमुख सिद्धेश्वर कदम यांनी व्यक्त केले ते गौरीशंकरचे सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयाचे गाथा सोहळा आनंदाचा वार्षिक स्नेहसंमेलन 2025 महासैनिक भवन सातारा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ.नागेश अलूरकर, डॉ.सीमादेवी कदम, डॉ.मनोज शिंदे, प्रा. अनुराधा साळुंखे, मेङिस्र्पेचे एच आर प्रवीण घाडगे, डी फार्मसीचे विभाग प्रमुख डॉ.अविनाश भोसले ,प्रबंधक हेमंत काळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख मंजिरी जाधव उपस्थित होते.
सिद्धेश्वर कदम पुढे म्हणाले की शैक्षणिकज्ञानाइतके जीवनात कलासंस्कृतीचे महत्त्व आहे कलेची साधना करिअरसाठी पूरक ठरते महाविद्यालय जीवनातील आनंद घेताना सामाजिक भानही आपण जपले पाहिजे.
संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की सांस्कृतिक साधना मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे नवचैतन्य व उत्साहाचा झरा खळखळून वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात सहभागी होणे आवश्यक आहे .
यावेळी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर बरोबरच विद्यापीठाच्या यादीत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांबरोबरच विविध कला क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उचित सत्कार सिद्धेश्वर कदम व प्रविण घाडगे यांच्या हस्ते करण्यात आला त्याचप्रमाणे औषध निर्माण शास्त्र क्षेत्रात नव संशोधन करणारे डॉ. मनोज शिंदे ,डॉ. अविनाश भोसले ,प्रा. स्पर्शी बांदेकर, यांचा बुके व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्काराचे सादरीकरण केले यामध्ये सोलो डान्स, ग्रुप डान्स, कॉकटेल डान्स, फॅशन शो, एकांकिका ,गायन अदि संस्कृती कार्यक्रमातून कलाअविष्कालातून रसिकजणांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.नागेश अलूरकर यांनी केले सूत्रसंचालन कु.वैष्णवी घाडगे यांनी केले. आभार सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा. मंजिरी जाधव यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिमखाना विभाग तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ
वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना सिद्धेश्वर कदम समवेत श्रीरंग काटेकर, डॉ. नागेश अलूरकर, प्रविण घाडगे, हेमंत काळे ,मंजिरी जाधव

