निबंध लेखन आणि काव्यलेखन स्पर्धा


सातारा नगर वाचनालयातर्फे आयोजन
सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले)नगरवाचनालय ,सातारा यांचे वतीने महिला दिन व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दीवर्षाचे औचित्य साधून फक्त महिला तसेच महाविद्यालयीन युवती यांच्यासाठी निबंध लेखन तसेच काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
सातारा शहर व परिसरातील अठरा वर्षावरील फक्त महिला तसेच महाविद्यालयीन युवती स्पर्धेत सहभागी होऊ शकतात . खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे १००० ते १५०० शब्दात निबंध लिहावयाचा आहे.
अ) कर्मयोगिनी धर्मरक्षिणी अहिल्याबाई होळकर
आ) कुशल प्रशासक अहिल्याबाई होळकर
इ) लोकमाता अहिल्याबाई होळकर
हस्तलिखित स्वरूपातील निबंध ८ मार्च २०२५ पर्यन्त ग्रंथपाल,नगरवाचनालय ३६ भवानी पेठ,सातारा ४१५००२ या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा किंवा प्रत्यक्ष येऊन द्यावा.त्यावर आपले संपूर्ण नांव,पत्ता,मोबाईल नंबर लिहावा.
काव्यलेखनासाठी विषय :
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (अहिल्याबाईंचे जीवनचरित्र सांगणारी,त्यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू उलगडणारी कविता)
वर नमूद केलेल्या विषयावरील आपली कोणतीही एक कविता ८ मार्च २०२५ पर्यन्त ग्रंथपाल,नगरवाचनालय ,३६ भवानी पेठ,सातारा ४१५००२ या पत्त्यावर पोस्टाने पाठवावी किंवा प्रत्यक्ष येऊन द्यावी.त्यावर आपले संपूर्ण नांव,पत्ता,मोबाईल नंबर लिहावा.
स्पर्धक निबंध व काव्यलेखन अशा दोन्ही स्पर्धांत किंवा कोणत्याही एका स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
स्पर्धेचा निकाल गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी जाहीर करणेत येईल व तेव्हाच याचे पारितोषिक वितरण होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!