दुभाजकातील फुलझाडे छाटली


निसर्गप्रेमी कडून संताप व्यक्त
सातारा
रखरखत्या उन्हामध्येही मनाला व नेत्रांना अल्हादायक व प्रफुल्लित करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील लिंबखिंडीतील दुभाजकामधील बहरलेल्या रंगीबेरंगी फुलझाडांवर प्रहार करीत ती छाटल्याने निसर्गप्रेमीतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुभाजकात बहरलेली ही फुलझाडे या मार्गाची निसर्गशोभा वाढवीत होती येथील रंगीबेरंगी फुलांमधील भ्रमराचा वाढता वावर पाहून निसर्गप्रेमी सुखवत होते .निसर्ग आणि मानवी जीवनाची अतूट नाते व ऋणानुबंधाच्या एक धागा विणला जात होता अशा नयनरम्य बहरलेल्या दुभाजकातील फुल झाडांवर रस्ते वाहतूक विभागाने प्रहार करून निसर्गप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत बहलेल्या फुल झाडांचा हा परिसर क्षणात विद्रूप व भकास झाला आहे .हिरवेगार झाडांवर फुललेली फुले आता दुभाजकात
कोमजून गेली आहेत निसर्गद्रोह करणाऱ्या या वृत्तीचा निसर्गप्रेमीकङून निषेधच व्यक्त होत आहे.
लिंबखिंड (सातारा )या परिसरातून लाखो प्रवासी व वाहन चालक प्रवास करताना बहरलेली रंगीबेरंगी फुलझाडे पाहून त्यांच्या मनाला खूप प्रसन्न वाटत होते सुखकर प्रवासाचा आनंद फुलांकडे पाहून घेता येत होता दुभाजकातील फुलझाडे तोडल्याने निसर्गप्रेमींच्या मनाला खूप यातना व दुःख होत आहे अशी प्रतिक्रिया निसर्गप्रेमी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!