राजन लाखे यांच्या गझलायनचे शनिवारी प्रकाशन
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतपेढीतर्फे आयोजन
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतपेढी मर्यादित सातारातर्फे लेखक, संपादक, कवी राजन लाखे यांच्या “गझलायन” या गझलसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल,शनिवार पेठ-सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी समीक्षक लेखक देवानंद सोनटक्के, मसाप चे कोषाध्यक्ष,महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी, मसाप चे कार्यवाह शिरीष चिटणीस,ज्येष्ठ गझलकार वसंत शिंदे, लेखिका सीमंतिनी नूलकर आदी उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार-लेखक मुकुंद फडके करणार आहेत.
या गझल संग्रहात विविध ४२ वृत्तात ६१ गझला असून गझलमधील काफिया, अलामात, उला मिसरा, मक्ता, मतला, ऊला मिसरा सानी मिसारा, तखल्युस अशा प्रचलित शब्दांची माहिती दिली आहे. नवोदित गझल लिहिणाऱ्यांसाठी हा गझल संग्रह उपयुक्त ठरणार आहे अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी दिली.
गझलकार राजन लाखे हे महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष असून ५ काव्यसंग्रह, १ ललित लेखसंग्रह, ढब्बू ढेरपोट्या (बालसाहित्य), शान्ता शेळके जन्म शताब्दी ग्रंथ : बकुळगंध त्यांच्या नावावर आहे. साहित्यिकांनी व रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात “गझलायन “ या गझल संग्रहातील काही गझलांचे संगीतमय सादरीकरण प्रसिद्ध गायक व संगीतकार दौलत खंडझोडे,लोकमंगल हायस्कूल,नागेवाडी-कुशी चे माजी विद्यार्थी करणार आहेत.

