टीम इंडियाने घेतली मोदी यांची भेट
मोदी याना नमो लिहिलेली क्रमांक 1जर्सी भेट
नवी दिल्ली
टीम इंडियाने नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी टीम इंडियासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबीयांची देखील भेट घेतली.
नरेंद्र मोदींनी एक्स हँडलद्वारे (आधीचे ट्विटर) दोन फोटो शेअर केले. यावेळी नरेंद्र मोदींनी टीम इंडियासाठी लिहिले की, “चॅम्पियन्ससोबत छान भेट झाली” 7, लोककल्याण मार्ग येथे विश्वचषक विजेत्या संघाचे स्वागत करण्यात आले. यादरम्यान संस्मरणीय गोष्टी घडल्या, असं नरेंद्र मोदी म्हणाले. टीम इंडियाच्या खेळाडूंना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी टीम इंडियाची जर्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. या जर्सीचा क्रमांक 1 होता आणि त्यावर नमो असे लिहिले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
