दिल्ली विधानसभा निवडणूक ५ फेब्रुवारीला


तीन दिवसांनी म्हणजेच 8 फेब्रुवारीला मतमोजणी

Advertisement

नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, दिल्लीतील विधानसभेच्या 70 जागांपैकी 12 राखीव आहेत आणि उर्वरित 58 सर्वसाधारण जागा आहेत.
दिल्लीत एकूण 1.55 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 83.49 लाख पुरुष तर 71.74 लाख महिला मतदार आहेत. दिल्लीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या दोन लाख आहे. दिल्लीमध्ये एकूण 13 हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
आम आदमी पक्षाने दिल्लीतील सर्व 70 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्याचवेळी भाजपने 29 उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. याशिवाय काँग्रेसने आतापर्यंत 40 हून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
भाजपला दिल्ली विधानसभा ताब्यात घ्यायची आहे तर दुसरीकडे आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना दिल्ली आपल्या ताब्यात ठेवायची आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!