पीएन गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ १० सप्टेंबरला लाँच होणार


किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 31 शेअर्सचा लॉट खरेदी करावा लागणार
मुंबई
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्वेलर ब्रँ पैकी एक असलेल्या पीएन गाडगीळ ज्वेलर्स या दागिने घडवणाऱ्या कंपनीचा आयपीओ उद्या म्हणजेच १० सप्टेंबरला बाजारात लॉंच होणार आहे.10 सप्टेंबर रोजी हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला होईल आणि 12 सप्टेंबर रोजी बंद होईल असं कंपनीने सांगितलं आहे. हा आयपीओ ११०० कोटींचा असणार असून यासाठी ४५६ ते ४८० रुपयांचा प्राइज बँड निश्चित करण्यात आला आहे
पीएन गाडगीळ ज्वेलर्स कंपनी आयपीओच्या माध्यमातून 22,916,667 इक्विटी शेअर्स विकणार आहे. यातील 850 कोटी रुपयांचे 17,708,334 इक्विटी शेअर्स जारी केले जातील. तर ऑफर फॉर सेल अंतर्गत 250 कोटी रुपयांचे 5,208,333 इक्विटी शेअर्स विकले जातील. किरकोळ गुंतवणूकदारांना हा आयपीओ खरेदी करायचा असेल तर कमीत कमी 31 शेअर्सचा एक लॉट खरेदी करावा लागेल. म्हणजेच सुमारे 14,880 रुपयांचे शेअर्स तुम्हाला विकत घ्यावे लागतील. आयपीओ अंतर्गत शेअर्सचं वाटप १३ सप्टेंबर रोजी अंतिम केलं जाईल. त्यानंतर १७ सप्टेंबरला बीएसई आणि एनएसईवर शेअर्स लिस्ट होतील. पु.ना.गाडगीळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ऑर्गनाईज्ड ज्वेलर्स आहेत. त्यांचे महाराष्ट्र आणि गोव्या ३३ स्टोअर्स आहेत. तसंच अमेरिकेतही एक स्टोअर आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!