आसामची पहिली एआय शिक्षिका


विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता

गुवाहाटी,
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आता आता एआय टीचरनेही भारतात प्रवेश केला आहे. आसाम आणि ईशान्य भारतातील पहिल्या एआय शिक्षिकेचे नाव आयरिश असे असून गुवाहाटीमधील एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची क्षणार्धात उत्तरे देत आहे

Advertisement

या शिक्षिकेने आसामची पारंपारिक ‘मेखला चादर’ आणि दागिने परिधान केले आहेत. प्रश्न अभ्यासक्रमाशी संबंधित असोत किंवा इतर कोणत्याही विषयावरील असो, ‘आयरिस’ उदाहरणांसह तत्काळ प्रतिसाद देण्यास सक्षम आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्येही आयरीसची उत्सुकता दिसून आली.आयरिसमध्ये व्हॉईस कंट्रोल असिस्टंट आहे जो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आणि तपशीलवार स्पष्टीकरण देण्यात मदत करतो.
नीती आयोगाने सुरू केलेल्या अटल टिंकरिंग लॅब प्रकल्पांतर्गत हा रोबोट विकसित करण्यात आला आहे. आयरिस ही आसामची पहिली ए आय शिक्षिका आहे. तिच्या प्रक्षेपणाच्या वेळी, आयरिसने विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची तत्परतेने उत्तरे दिली. शाळेतील एका शिक्षिकेनुसार, आयरिसच्या या उत्तराने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!