वार्षिक राशिभविष्य 2025:कर्क


वार्षिक राशिभविष्य 2025
2025 च्या पोटात काय दडले असेल याची उत्सुकता सगळ्यांना असेल पुढील वर्षी शनी महाराज 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपत असून मेष राशीची साडेसाती सुरू होईल 14 मे 2025 रोजी गुरुचा मिथुन राशीत प्रवेश होईल तसेच 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू यांचाही राशी बदल होईल राहू मीनेतून कुंभ राशीत प्रवेश करेल तर केतू कन्येतून सिंह राशीत प्रवेश करील वार्षिक भविष्य पाहताना वरील मुख्य ग्रहांचे राशी बदल आणि इतर सर्व ग्रहांचे गोचर पाहून राशिफल तयार होते
कर्क
नवीन नोकरीची ऑफर मिळेल
कर्क राशीच्या व्यक्तींना 2025 हे नवीन वर्ष थोडं आव्हानात्मक राहील मात्र वर्षाची सुरुवात खूप चांगली होईल नवीन नोकरीची ऑफर मिळतील किंवा चांगली प्लेसमेंट मिळेल तसेच कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल या राशीच्या व्यक्तींना मे महिन्यापर्यंत गुरुचे भ्रमण अनुकूल राहील कुटुंबात मंगल कार्य होतील समाजात मानसन्मान मिळेल राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद मिळेल राजकारण क्षेत्राशी संबंधित कर्क राशीच्या व्यक्तींना व्यक्तींना काही अडचणी येऊ शकतात एखादे जुने प्रकरण या व्यक्तींच्या विरोधात जाऊ शकते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकल सैन्य शैक्षणिक या क्षेत्रात नोकरी मिळेल जोडीदाराशी संबंध चांगले ठेवा वाहन चालवताना सावध राहा प्रेम संबंधातही वर्षाच्या सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात मार्च नंतर प्रेम संबंधात गोडी येईल अनेक प्रेमिकांचे वैवाहिक जीवन सुरू होईल याच काळात वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आरोग्य बिघडू शकते त्यामुळे सावध राहा 29 मार्च 2025 रोजी तुमची शनीची दह्या संपते आहे म्हणजे शनी तुमच्या अष्टमस्थानातून नवमस्थानात प्रवेश करेल शनी कुंभ राशीतून मीन राशि मध्ये प्रवेश करेल त्यामुळे गेली अडीच वर्षे अनेक अडचणी अडथळे यामधून कर्क राशीच्या व्यक्तींना त्रास झाला असेल तर तू आता संपेल पण तरीही धनप्राप्ती नियमित होण्यासाठी थोडा काळजावा लागेल कुटुंबात कधी आनंद तर कधी निराशेचं वातावरण राहील 14 मे 2025 रोजी गुरुचे गोचर तुमच्या बाराव्या स्थानातून म्हणजेच मिथुन राशीतून होणार आहे आतापर्यंत गुरुचा लाभस्थानातून प्रवास तुम्हाला लाभदायक होता पण आता गुरूच्या शुभ प्रभावामध्ये थोडी कमी येईल त्यामुळे तुम्हाला सावध राहावे लागेल तुमच्या विश्वासातील लोकच तुमचा विश्वासघात करू शकतात किंवा तुम्हाला वाईट ठरवू शकतात काही व्यक्ती या काळात परदेश प्रवास करू शकतात काहींना परदेशात नोकरीची ऑफर येईल काहींचे स्थान परिवर्तन होईल काही जण आपल्या स्वतःच्या घरात प्रवेश करतील विवाहित इच्छुकांचे विवाह यावर्षी होतील गुरु अधीचारी गतीने 18 ऑक्टोबर ते पाच डिसेंबर 2025 पर्यंत कर्क राशीत राहतील त्यामुळे या काळात विवाह होण्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत 30 मे रोजी राहू आणि केतूचे गोचर तुमच्या अष्टम आणि द्वितीय स्थानातून होईल राहूचे अष्टमस्थानातून गोचर मुळे तुम्हाला शेअर बाजारातून चांगला लाभ मिळू शकतो परंतु त्याचा परिणाम कौटुंबिक जीवनावर तसेच मानसिक स्वास्थ्यावर फारसा चांगला असणार नाही नवीन वर्षातील फेब्रुवारी मार्च जुलै आणि सप्टेंबर हे महिने काहीसे आव्हानात्मक राहतील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!