स्टेट बँकेत मोठी भरती
13735 जागांसाठी निघाली जाहिरात
मुंबई
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण, एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क (लिपिक) पदासाठी तब्बल 13,735 पदांची भरती निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वच उमेदवारांना ही नामी संधी असून बंपर भरतीसाठी लगेचच अर्ज करायला हवा. एसबीआयमध्ये ज्युनियर एसोसिएट (कस्टमर सपोर्ट एंड सेल्स) च्या पदांसाठी ही भरती निघाली असून उमेदवारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन उमेदवारांना अर्ज करता येईल. त्यासाठी, नोंदणी प्रक्रिया बुधवार १८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. तर, 7 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
अर्ज भरण्यासाठी सुरुवात – बुधवार १८ डिसेंबर 2024
अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 7 जानेवारी 2025
प्रिलियम परीक्षा तारीख- अंदाजे फेब्रुवारी 2025
मुख्य परीक्षेची तारीख- अंदाजे मार्च/एप्रिल 2025
एसबीआयमधील या पदांसाठी उमेदवारांकडे कुठल्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. इंटीग्रेटेड डूअल डिग्री (आईडीडी) सर्टिफिकेट वाल्या उमेदवारांनी 31 डिसेंबर 2024 च्या अगोदर आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2024 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1996 च्या अगोदर आणि 1 एप्रिल 2004 च्या नंतर झालेला नसावा.
या क्लर्क पदासाठी सर्वसामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना परीक्षा शुल्क 750 रुपये भरावे लागणार आहे. तर, एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/एक्सएस/डीएक्सएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना शुल्कात सूट देण्यात आली आहे. उमेदवारांना शुल् भरताना डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंगचा वापर करावा लागेल.
अधिक माहितीसाठी उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन भेट देऊ शकतात.

