हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून


प्रश्न उत्तरांचा तास नसल्याने अधिवेशन कमी दिवसांचे
मुंबई
महाराष्ट्रात येत्या गुरुवारी नवं सरकार स्थापन होणार आहे . विधानसभेच्या निकालानंतर महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला १६ ते २१ डिसेंबर दरम्यान पार पडणार असून प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्याने यंदा अधिवेशन कमी दिवसांचे राहणार आहे . विधानसभेच्या निकालानंतर लगेचच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात झाली होती . या अधिवेशनाकडे राज्यातील सर्वांच्या नजरा लागल्या असून लाडक्या बहिणीच्या वाढीवर रकमेवर अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे . सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसातच हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे . पहिल्याच अधिवेशनामध्ये यावेळी विरोधीपक्ष नेता नसणार आहे . यंदा आमदारांच्या बैठक व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आले असून डिजिटल आसन व्यवस्था करण्यात आली आहे .
नवीन महायुती सरकारचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन असणार आहे.सरकार स्थापन झाल्यानंतर ऐनवेळी तयारी करणं शक्य नसल्यानं आता नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला गती आली आहे.या हिवाळी अधिवेशनात विशेष म्हणजे आमदारांना फायलींचं ओझं कमी होणार आहे. विधानसभा सभागृहात आमदारांच्या आसनासमोर सभागृहाच्या दैनंदिन कामकाजासह इतर माहिती देणारी डिजीटल स्क्रीन बसवण्यात येत आहे.ज्यामुळे आमदारांना सभागृहाच्या कामात सहभागी होताना सर्व माहिती एका क्लिकवर मिळवता येणार आहे.विधानपरिषद च्या आमदारांसाठी डिजिटल आसन व्यवस्था असणार आहे.
हिवाळी अधिवेशन कमी दिवसांचे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरली आहे. आता लाडक्या बहीणींच्या हप्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. हिवाळी अधिवेशनात लाडक्या बहिणींच्या वाढीव रकमेवर शक्यता आहे. जुलै 2024 मध्ये, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्ते रक्कम जमा करण्यात आली आहे. दरम्यान, आता लाडक्या बहिणींच्या हफ्त्यात वाढ करण्याचा निर्णय होऊ शकतो


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!