एडसचा विळखा, देई मूत्यूला निमंञण


1 डिसेंबर 2024 जागतिक एडस निर्मुलन दिन म्हणून सर्वञ पाळला जातो. त्यानिमित्याने एडसग्रस्त रुग्नांची व्यथा व वेदना व त्यावर उपचार पध्दती यावरती मंथन होत असते. या विषयी गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांचा लेख

जगात सर्वाधिक एडसग्रस्त रुग्नांची संख्या भारतात असल्याचे युनिसेफ या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. या गंभीर समस्याशी लढा देणे हे एक आव्हान जगापुढे उभे राहीले आहे. काळानुसार बदलणारी मानवी जीवनशैलीमुळे अनेक आरोग्याशी निगडीत प्रश्न उभे राहीले आहेत. मुक्त जीवनशैली व चंगळवादी प्रवृतीमुळे तरुण, तरुणाईमधील निर्माण झालेले शारीरिक आकर्षण व व्यसनाधिनचा पडलेला प्रभाव यातुन निर्माण झालेल्या भावनिक व शारिरीक संबंधामुळे कळत नकळत घडलेल्या चुकामुळे एडस हा महाभयंकर आजाराचे बळी अनेकजण पडले आहेत.
जगात २५% नागरिक या आजाराचे शिकार बनले आहेत. त्यामधील १३% नागरिक हे भारतातील आहेत. देश पातळीवर या आजाराचे वाढते प्रमाण पाहाता केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत एडस निर्मुलन मोहीमे अंतर्गत शासकिय व निमशासकिय, खाजगी संस्था, शाळा, कॉलेज, सामाजिक संस्थामध्ये प्रबोधन व जनजागृतीच्या माध्यमातून लढा उभारला आहे. या मोहीमेला व्यापक स्वरुप प्राप्त होण्यासाठी लोकसहभाग व लोक चळवळीची साथ ही मिळणे तितकेच महत्वाचे आहे. अजूनतरी एडस या रोगावर प्रभावी औषध उपलब्ध झालेले नाही.
सन १९८३ साली फ्रान्सचे नामांकित शास्त्रज्ञ डॉ. ल्युक मॉटॅग्रियर यानी सर्वप्रथम एडसच्या रोगास कारणीभुत विषाणूचे संशोधन करण्यात यश आले. भारतात एडस या रोगाचे प्रमाण मोलमजुर, ट्रकचालक व आदिवासी याच बरोबर अशिक्षित व व्यसनाधिन युवकाममध्ये मोठयाप्रमाणात आढळून येते. मुंबई, पुणे, सांगली, सोलापुर, ठाणे आदी भागात याचे प्रमाण अधिक असलेचे दिसून आले आहे. एडस निर्मुलनासाठी अनेक सामाजिक संस्था केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने शहरी व ग्रामीण भागात प्रबोधन, प्रचार प्रसार मोहीममुळे एडस आजाराबाबतची माहीती आता नागरिकाना सहज उपलब्ध होत आहे. याचा प्रभाव ही समाज जीवनवर होत आहे. भविष्य काळात एडसमुक्त भारत निर्मितीसाठी विवाहपुर्व लौगिंक संबंध टाळा, विवाह बाहय संबंध टाळा, कंडोमचा वापर करा, निर्जुतक उपकरणाचा आग्रह धरुन एड्स निर्मुलन मोहीमेला हातभार लावूया.

Advertisement

संपूर्ण जगाला एडस या आजाराचा विळखा पड़‌ला आहे अदयाप यावर प्रभावी औषधनिर्मितीचे संशोधन न झाल्याने अनेक रग्न या आजाराची शिकार झाले आहेत संपूर्ण जगासाठी हा गंभीर विषय बनला आहे विवाहबाह्य संबंध शरिरिक सबध व व्यसनधितताचे तरुणाई मध्ये वाढते प्रमाणामुळे यात भर पडत आहे विशेषता तरुणाईची संख्या मोठ्याप्रमाणत असल्याने हा संपूर्ण विश्वासाठी चिंतेचा विषय ठरत आहे

श्रीरंग काटेकर
जनसंपर्क अधिकारी
गौरीशंकर नॉलेज सिटी, सातारा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!