2040 मध्ये भारतीय अंतराळवीर थेट चंद्रावर उतरणार


इसरो प्रमुख एस सोमनाथ यांची माहिती
नवी दिल्ली
गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अवकाश संशोधन क्षेत्रीत मोठी प्रगती केली आहे. चांद्रयान कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यावर वेगाने काम सुरू आहे. 2040 मध्ये चंद्रावर एका मानवाला उतरवण्यासाठी चांद्रयान-4 ची योजना आखली जात आहे. चांद्रयान मालिकेला पुढे नेण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत.अशी माहिती भारताने अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली.
गेल्या वर्षीच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान-3 ची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केली.चंद्राच्या या भागात यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला. या मोहिमेच्या यशानंतर आता इसरो चक्क एका मानवाला चंद्रावर उतरवण्याची तयारी करत आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना, एस सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यावर वेगाने काम सुरू आहे. 2040 मध्ये चंद्रावर एका मानवाला उतरवण्यासाठी चांद्रयान-4 ची योजना आखली जात आहे. चांद्रयान मालिकेला पुढे नेण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. पंतप्रधान मोदींनी घोषणा केली आहे की, 2040 मध्ये एक भारतीय व्यक्ती चंद्रावर उतरेल. यासाठी आपल्याला विविध मार्गांनी चंद्राचा शोध घेणे सुरुच ठेवावे लागेल.
गेल्या वर्षी इस्रोने चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवले होते. अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरला. भारताचे सौर मिशन, आदित्य एल-1 देखील 2024 च्या सुरुवातीला यशस्वी झाले. आता या वर्षी भारताची सर्वात महत्वाकांक्षी मोहीम ‘गगनयान’ आहे. या मोहिमेत भारत आपले अंतराळवीर तीन दिवसांसाठी अंतराळात पाठवणार आहे. हे अभियान पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार जुलैमध्ये पार पडेल


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!