नितीन देसाई यांचा स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात


चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे व्यवस्थापन
मुंबई
प्रसिद्ध कलादिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडीओ महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं परिचालनासाठी ताब्यात घेतला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी काल एन.डी. स्टुडीओला भेट देऊन स्टुडिओतल्या कामकाजाची पाहणी केली. तसंच तिथे कार्यरत असलेल्या व्यवस्थापनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नियमित कार्यप्रणाली समजून घेतली. आता एन.डी.स्टुडीओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर आणि विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील प्रशासकीय कामकाज पाहणार आहेत.
यापुढे एन.डी.स्टुडीओचं दैनदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरणे, महसूल वाढ, लेखा विषयक कामे शासनाच्या वतीनं महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरु राहणार आहेत. स्टुडिओच्या प्रशासकीय आणि विकासात्मक कामांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक यांच्या सनियंत्रणाखाली विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!