शनिवारी साताऱ्यात हेमंत कुमार यांच्या गीतांचा कार्यक्रम


दीपलक्ष्मी पतसंस्था आणि आम्ही आनंदयात्री ग्रुपतर्फे आयोजन

सातारा

येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि आम्ही आनंदयात्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ गायक आणि संगीतकार हेमंत कुमार यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.याद किया दिल ने कहा हो तुम या शीर्षकाखालील हा कार्यक्रम शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये होणार आहे

या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन मुकुंद पांडे यांचे असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष चिटणीस,विजय साबळे, मुकुंद फडके, धरेंद्र राजपुरोहित, मुकुंद पांडे उपस्थित राहणार आहेत

Advertisement

यावेळी हेमंत कुमार यांची कर्णमधुर गाणी आशुतोष वाळिंबे,ऍड लक्ष्मीकांत अघोर, प्रशांत कुलकर्णी, आशुतोष देशपांडे, अरुण कुलकर्णी, मुकुंद पांडे ,प्रिया अघोर, ऍड रेश्मा वाळिंबे, मधु गिजरे आणि विजया चव्हाण हे कलाकार सादर करणार आहेत

या कार्यक्रमाच्या निवेदिका ऍड स्नेहल कुलकर्णी असून ध्वनीव्यवस्था सचिन शेवडे अक्षता शेवडे पाहणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे शिरीष चिटणीस आणि आम्ही आनंदयात्री ग्रुपतर्फे मुकुंद पांडे यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!