“किनारे सावल्यांचे” ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन


मान्यवरांकडून लेखिका शुभदा कुलकर्णी यांच्या शैलीचा गौरव
सातारा
वडुज येथील विधिज्ञ, कवयित्री- लेखिका सौ. शुभदा कुलकर्णी यांच्या “किनारे सावल्यांचे” या ललित लेखसंग्रह पुस्तकाचे प्रकाशन येथील दीपलक्ष्मी सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पार पडले यावेळी सर्वच मान्यवरांकडून लेखिका शुभदा कुलकर्णी यांच्या लेखनशैलीचा गौरव करण्यात आला
प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजेंद्र माने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य,मराठी साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष तसेच मराठी साहित्य परिषद शाखा शाहुपुरीचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी,ज्येष्ठ पत्रकार आणि न्यूजमंडी पोर्टलचे संपादक मुकुंद फडके,शिरीष चिटणीस आणि प्रकाश कुलकर्णी उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली
सातारा शहरात सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये योगदान देणा-या दिपलक्ष्मी पतसंस्थेने हा प्रकाशन समारंभ आयोजित केला होता. वडुज सारख्या ग्रामीण भागात राहत असुन सुध्दा या प्रकाशन साेहळयास शिरीष चिटणीस आणि त्यांचे सहकारी यांनी माेलाची मदत केली याबद्दल प्रास्ताविकामध्ये लेखिका शुभदा कुलकर्णी यांनी दिपलक्ष्मी परिवाराविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि या पुस्तकामागील प्रेरणा व लेखनप्रक्रिया स्पष्ट केली
या पुस्तकाच्या निमित्त्ताने एक सशक्त लेखक साता-याचे प्रतिनिधित्व विविध ठिकाणी होणा-या साहित्य संमेलनामध्ये करेल असा विश्वास विनोद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
“किनारे सावल्यांचे” या पुस्तकाच्या माध्यमातुन सातारा जिल्हयातील लेखन परंपरा पुढे नेण्याचे काम शुभदा कुलकर्णी या लेखिकेने केले असल्याचे शिरीष चिटणीस यांनी नमुद केले.
मुकुंद फडके यांनी या पुस्तकातील ललित लेखनाचा आढावा घेताना पुस्तकाची बलस्थाने स्पष्ट केली अत्यंत काव्यात्मक शैलीत लिहिलेले हे लेखन वाचकांना भूतकाळात घेऊन जाते आणि तेथे रमायला लावते असे ते म्हणाले
शुभदा कुलकर्णी यांच्या लेखनामध्ये निसर्गसंपन्न अशा वाई परिसरातील अनेक व्यक्ती आणि घटनांचे उल्लेख सहजतेने परंतु तितक्याच सकसपणे अभिव्यक्त होतात,असे उदगार पत्रकार डॉ राजेंद्र माने यांनी या प्रसंगी काढले.शुभदा कुलकर्णी यांच्याकडून असेच सकस लेखन भविष्यात अपेक्षित आहे असे त्यांनी सांगितले मिरजहुन खासकरुन उपस्थित असलेले प्राध्यापक प्रकाश कुलकर्णी यांनी “किनारे सावल्यांचे” हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व वाचनालयांपर्यंत पोहचवले जाईल याची हमी घेतली.
रसिकांच्या सभागृतील भरगच्च उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभाचे आभार निशांत कुलकर्णी यांनी मानले
या संपुर्ण सोहळयाचे सुत्र संचालन ज्येष्ठ रंगकर्मी कवि चंद्रकांत कांबिरे यांनी केले. वकील भरमगुंडे व विनायक ठिगळे यांनी म्हटलेल्या पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
रंगकर्मी सौ. शिल्पा चिटणीस, सौ. सविता कारंजकर, प्रा. जाधव, लेखक संदिप आवाड,अॅड प्रशांत प्रभुणे, अनुराधा कापरे,विकास प्रभुणे,प्रसाद सोलापूरकर,जाधव सर,रंजना डफळे,सुरेश शिंदे,प्रज्वल मोरे,वसुंधरा निकम,जयंत लंगडे अनिल पुजारीअशा मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास लाभली.

Advertisement

फोटो ओळ
किनारे सावल्यांचे ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन करताना विनोद कुलकर्णी ,शिरीष चिटणीस, डॉ राजेंद्र माने, मुकुंद फडके , लेखिका शुभदा कुलकर्णी , चंद्रकांत कांबीरे

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!