तरुण अभिनेत्याची आत्महत्या ?


नितीन चौहानने वयाच्या 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Advertisement

मुंबई
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नितीन चौहानने वयाच्या 35 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. नितीनने गुरुवारी मुंबईत निधन झाले. त्याच्या एका सहकलाकाराने सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे. नितीनने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही.
नितीन हा मूळचा उत्तर प्रदेशचा होता. दादागिरी-2 या रिलॅलिटी शोचं विजेतेपद मिळवल्यानंतर बरीच प्रसिद्धी मिळवली. तसेच त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांमध्येही स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली होती.नितीनने ‘जिंदगी डॉट कॉम’, ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘फ्रेंड्स’ यांसारख्या टीव्ही शोमध्येही काम केले आहे. पण क्राइम पेट्रोल या कार्यक्रमामुळेत्याला खरी प्रसिद्धी मिळाली.
नितीन शेवटचा 2022 मध्ये सब टीव्हीच्या ‘तेरा यार हूं मैं’ या मालिकेत दिसला होता. या मालिकेतील त्याचे सहकलाकार सुदीप साहिर आणि सायंतानी घोष यांनी नितीनच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण त्यांच्याकडेही कोणती अधिक माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच त्याची सहकलाकार विभूती ठाकूरच्या पोस्टवरुन नितीनने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय.त्याच्या मृत्यूची बातमी मिळताच त्याचे वडील मुंबईला पोहोचले आहेत आणि त्याचे पार्थिव परत अलिगडला घेऊन जातील. सध्या तरी पोलिसांकडून याबाबत कोणतेही माहिती समोर आलेली नाही.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!