कार्यकर्त्याच्या मोबाईल स्टेटसवरून साताऱ्यात संघर्ष


ऐन निवडणुकीत कोरेगावच्या उमेदवारांमध्ये वादावादी
सातारा
साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे प्रचारात व्यस्त असतानाच शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे यांच्याबाबत एका युवकाने आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियाच्या स्टेटसवर ठेवल्याच्या कारणावरून या मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले
या प्रकरणात संबंधित युवकावर महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये बोलवून पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला आहे. पुसेगाव पोलीस ठाण्यासमोर शेकडो कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन शशिकांत शिंदे यांनी ठिय्या आंदोलन केले. संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जोपर्यंत निलंबित करत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही, अशी भूमिका शशिकांत शिंदे आणि कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे पुसेगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
‘गेल्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने कोरेगाव मतदारसंघांमध्ये पोलीस यंत्रणेचा वापर करून जबरदस्तीने या ठिकाणी लोकांना धाक दाखवून पक्षांतर करण्याचा प्रयत्न होतोय. याचा निषेध करण्यात आलेला आहे. आचारसंहिता असताना पोलिसांनी पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याची भूमिका बजावू नये असं आमचं सांगणं असताना सुद्धा सातत्याने त्याच पद्धतीची कारवाई करण्यात येत आहे. निवडणूक ही लोकशाही ने होऊ दे. विरोधकांची निवडणूक त्यांच्या हातातून गेली असल्यामुळे ते अशा गोष्टीचा वापर करत आहे. पोलिसांच्या माध्यमातून गेले दोन-तीन महिन्यापासून कार्यकर्त्यांना पक्षांतर करायला लावत आहे. याची यादी माझ्याकडे आहे. अशा पद्धतीने पोलिसांकडून दहशत होत असेल, तर त्याचा मी निषेध करतो”, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

Advertisement

शशिकांत शिंदे यांनी केलेल्या आरोपावर महेश शिंदे म्हणाले, ”शशिकांत शिंदे यांना कामच काही उरलेलं नाही. आम्ही केलेली विकासकामे आणि लोक आमच्यासोबत येत आहेत, त्यामुळे त्यांचे डोके फिरले आहे. मागे काही दिवसांपूर्वी देखील ऊस पेटवला म्हणून आमच्यावर आरोप केला, हा सर्व स्टंट आहे. संबंधित युवकाने घाणेरडा स्टेटस ठेवला होता का? याच्या मुळात जावा…त्यांनी काहीच केले नाही का? मग यांच्या मुलाने केले का? मागील काही दिवसांपूर्वी देखील ऊस जो पेटवला यामध्ये देखील माजी आमदारांचा सहभाग आहे. त्यांनीच हे कट कारस्थान केले. त्यांची सोशल मीडियाची टीम यामध्ये सहभागी आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!