महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन


महाबळेश्वर
महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात आज पांढऱ्या रंगाच्या दुर्मिळ शेकरुने दर्शन झाले शेकरु महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. महाबळेश्वर येथील जंगल परिसरात अनेक वन्यजीवांचे अस्तित्व असून या वन्यजीवांमध्ये प्रमुख आकर्षण शेकरुचे आहे. खारीपेक्षा आकाराने मोठी असणारी खार म्हणजे शेकरू. परिसरामध्ये शेकरू मोठ्या प्रमाणावर आढळतात. बऱ्याचदा येथे फिरताना सहज झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारताना त्याचे दर्शन होते. झाडावरील फळे हा त्याचा मुख्य आहार तर झाडाच्या सुरक्षित उंचीवर सुक्या काटक्यांच्या सहाय्याने तो आपले घर बांधतो .
अनेकदा वन्य प्राण्यांमध्ये मेलानिनच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग अर्धवट पांढरा किंवा पूर्ण पांढरा होत असून सहसा दुर्मिळ अशा पांढऱ्या शेकरूचे दर्शन क्वचितच होते. तर महाबळेश्वर येथील तहसील भागात झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारताना आज पुन्हा एकदा पांढऱ्या शेकरूचे दर्शन झाले असून यापूर्वीही महाबळेश्वरच्या जंगलं परिसरात त्याचे दर्शन झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!