लोकमान्यमध्ये विद्यार्थी कौतुक सोहळा
चित्रकला स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा बक्षीस समारंभ
सातारा
लोकमान्य मल्टिपरपज पतसंस्थेत धनत्रयोदशीनिमित्य विद्यार्थी कौतुक सोहळा व लक्ष्मीपूजन मान्यवरांचे हस्ते संपन्न झाले धनत्रयोदशी ह्या दीपावलीच्या मंगलदिनी लोकमान्य मल्टिपरपज पतसंस्थेने गणपती उत्सवात विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या,”गणरंग”ह्या चित्रकला स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा बक्षीस समारंभ जेष्ठ चित्रकार व औन्ध संस्थानचे माजी अभिरक्षक भास्कर मेहेंदळे व जेष्ठ अभिनेते व सातारा जिल्हा संस्कारभारती अध्यक्ष दिलीप चरेगावकर ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता
कार्यक्रमाचे सुरवातीस शाखाप्रमुख सुनील मोरे संस्थेची,स्पर्धेची व संस्था घेत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली,त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी श्री दिलीप चरेगावकर व श्री भास्कर मेहेंदळे ह्यांचा परिचय करून दिला

उपस्थित विद्यार्थी व पालक तसेच संस्थेचे भागधारक ह्यांना मार्गदर्शन करताना दिलीप चरेगावकर म्हणाले,”संस्थेने ही चित्रकला स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांचे कलागुणाला वाव दिला आहे,ही स्पर्धा संस्थेने संपूर्ण महाराष्ट्र भर घेऊन रेकॉर्ड केले आहे,ह्यातूनच उद्याचे चित्रकार रवी वर्मा,वासुदेव कामत तयार होतील!संस्थेची ही सामाजिक बांधिलकी वाखाणण्या जोगी आहे.भास्कर मेहेंदळे ह्यांनी सर्व स्पर्धेचे परीक्षण केले,त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले!
टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले,प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू वितरण करण्यात आले,नंतर उपस्थितांना संस्थेतर्फे फराळ वाटप करण्यात आले!कार्यक्रमाचे दुसऱ्या टप्प्यात संस्थेचे वतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले,ह्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भा ज प जिल्हाध्यक्ष ऍड शिंगटे सपत्नीक हजर होते त्यांचे हस्ते व ईतर मान्यवर सभासदांचे हस्ते लक्ष्मीपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले नंतर सभासदांचा स्नेहमेळावा व चहापान व फराळ होऊन एक देखणा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास स्पर्धक विद्यार्थी, पालक,सभासद व शहरातील मान्यवर उपस्थित होते!!

