गाण्यातून उलगडले सावरकरांचे तेजस्वी जीवन


ब्राह्मण महासंघार्फे चारुदत्त आफळे यांचा कार्यक्रम

सातारा
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे तेजस्वी जीवनचरित्र नेहमी सर्वांना आकर्षित करते राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प चारुदत्त आफळे यांनी सावरकर यांचे हेच चरित्र गाण्यांच्या माध्यमातून उलगडून दाखवले अखिल ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या सागरा प्राण तळमळला या कार्यक्रमाच्या निमित्ताने चारुदत्त आफळे यांनी तमाम सातारकर सावरकर प्रेमींना पुन्हा एकदा नव्याने सावरकरांचे जीवनदर्शन घडवले येथील शाहू कला मंदिरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ सावरकर यांच्या प्रख्यात जयोस्तुते या भारतमातेच्या प्रार्थनेने चारुदत्त आफळे यांनी केला यावेळी चारुदत्त आफळे आणि त्यांच्या गायक सहकाऱ्यांनी सागरा प्राण तळमळला,अनादी मी अनंत शतजन्म शोधताना,खेळ मांडीयेला वाळवंटी काठी अशी अनेक गाणी सादर केली चारुदत्त आफळे यांनी आपल्या ओघवत्या वाणीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाचेही दर्शन घडवले संपूर्ण सावरकर कुटुंबाला हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा सावरकरांची उपेक्षा झाली हे त्यांनी सांगितले एक कवी म्हणून सावरकर किती श्रेष्ठ होते हे सांगताना आफळे यांनी सागरा प्राण तळमळला या गाण्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवला चारुदत्त यांचे पिताश्री किर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांनी सावरकरांवर लिहिलेल्या अनोख्या गीताचे सादरीकरण सुद्धा यावेळी चारुदत्त आफळे यांनी केले

Advertisement

 


सातारा जावली मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती ब्राह्मण महासंघाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून या निमित्ताने नव्या पिढीला सुद्धा सावरकरांच्या जीवनाचे दर्शन होणार आहे असे त्यांनी सांगितले महासंघातर्फे यावेळी चारुदत्त आफळे यांच्या हस्ते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आलाया कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली चारूदत्त आफळे वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी उपाध्यक्ष श्रीराम देव सचिव भास्कर मेहेंदळे खजिनदार महेश कुलकर्णी आणि सर्व संचालक यावेळी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी केले
अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन महेश कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीराम देव यांनी केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
या कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन सचिन शेवडे यांनी केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आणि इतर संचालक सायली मुतालिक मुकुंद फडके राजदिप माजगावकर शलाका शेवडे प्रशांत इनामदार श्रीकांत वेलणकर शशीकांत पंडित नितीन जोशी रेखा बंड यांनी परिश्रम घेतले

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!