इस्रायलकडून सर्वात मोठ्या शत्रूचा खात्मा
हमासचा प्रमुख याह्या सिनवार कारवाईत ठार
बैरूत
इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात गुरुवारी इस्रायलच्या लष्कराला मोठं यश मिळालं. इस्रायल डिफेन्स फोर्सने हमासचा प्रमुख याह्या सिनवारला ठार केलं. याह्या सिनवारच्या मृत्यूवर अमेरिकेकडून प्रतिक्रिया देण्यात आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, आयडीएफने गाझा पट्टीत हमासच्या तळांना टार्गेट करत एअरस्ट्राइक केला. यात सिनवारसह हमासच्या तिघांचा मृत्यू झाला. सिनवारचा मृत्यू झाल्याची खात्री डीएनएच्या आधारे केली. सिनवार हा इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या रॉकेट हल्ल्यांचा सूत्रधार मानलं जातं. यानंतरच मिडल ईस्टमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
हमाससोबत गाझात युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत हमास आणि लेबनॉनमधील अनेक कमांडर्सचा मृत्यू झाला आहे. हिजबुल्ला या युद्धात हमासच्या बाजूने इस्रायलवर हल्ले करत आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ट्विटरवरम्हटलं की, सिनावरचा खात्मा होणं हे इस्रायल आणि जगासाठी एक शुभ दिवस आहे

