वाचन प्रेरणा- मतदान जागृती संयुक्त उपक्रम


 

कोरेगावात मॉडर्न हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा कार्यक्रम

Advertisement

सातारा
विधानसभा निवडणूक निमित्त मतदान जनजागृती आणि माजी राष्ट्रपती महान शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा वाचन प्रेरणा दिन या दोन्हीचा संगम येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या उपक्रमातून साधण्यात आला! या उपक्रमावेळी मुख्याध्यापक डी एम साळुंखे ,केंद्रप्रमुख अनिता सूर्यवंशी, शिक्षक शिक्षिका, मतदार जनजागृती पथक प्रमुख यशेन्द्र क्षीरसागर ,सदस्य मंगेश घाडगे उपस्थित होते. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे ज्ञान शिक्षण आणि देशप्रेम यांचे चिरंतन प्रतीक आहेत. वाचन प्रेरणा मिळण्यासाठी त्यांच्या जयंतीदिनी वाचन विषयक उपक्रम राबवले जातात .मॉडर्न हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी यानिमित्त महत्त्वाच्या लेखांचे वाचन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आदर्श निवडणूक आणि आदर्श मतदार याविषयी विचार व्यक्त केले आहेत .त्याविषयीचा लेख तसेच महान देशभक्त उद्योगपती रतन टाटा यांच्या विषयीचा लेख असे दोन लेख यावेळी विद्यार्थ्यांना वाचण्यास देण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्याचे मनापासून वाचन केले. या लेखांच्या झेरॉक्स प्रती मतदान जनजागृती पथकाद्वारे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना भेट देण्यात आल्या. निवडणुक ही अचूक संधी भवितव्य घडविण्याची, मतदान नव्हे करमणूक अशा प्रभावी भाषेत तुकडोजी महाराजांनी निवडणुकीचे पावित्र्य अधोरेखित केले आहे. त्याविषयीचा हा लेख विद्यार्थी आणि शिक्षकांना भावला .तसेच रतन टाटा यांचे कष्टमय आणि यशस्वी जीवन सांगणारा लेख देखील विद्यार्थ्यांनी आवडीने वाचला. अशा रीतीने या उपक्रमातून वाचन प्रेरणा आणि मतदान जागृती असे दोन्ही हेतू साध्य करण्यात आले. या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी मॉडर्न हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!