संतांनी अध्यात्मिक लोकशाही रुजवली
वसंत व्याख्यानमालेमध्ये प्राध्यापक श्रीधर साळुंखे यांचे प्रतिपादन
सातारा
महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे संत ज्ञानेश्वर ते आधुनिक काळातील संतांचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वच संतांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून आध्यात्मिक लोकशाही रुजवण्याचे महत्वाचे काम केले असे प्रतिपादन ज्येष्ठ वक्ते प्रा श्रीधर साळुंखे यांनी केले
येथील ज्ञानविकास मंडळाच्या 51 व्या वसंत व्याख्यानमालेमध्ये संतांचे सामाजिक योगदान या विषयावर पुष्प गुंफ़ताना प्राध्यापक साळुंखे बोलत होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद कुलकर्णी उपस्थित होते
प्राध्यापक साळुंखे म्हणाले, ज्ञानदेवे रचला पाया तुका झालासे कळस हे वचन सर्वश्रुतच आहे आणि ज्ञानेश्वरांच्या काळापासून नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा संतांनी आपल्या कामाच्या माध्यमातून अध्यात्मिक पातळीवरील एका स्वतंत्र संस्कृतीला महत्त्व देऊन ही अध्यात्मिक लोकशाही बळकट घेण्याचे करण्याचे काम केले
महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय, रामदासी संप्रदाय,दत्त संप्रदाय ,नाथ संप्रदाय असे विविध प्रकारचे संप्रदाय जरी अस्तित्वात असले तरी या सर्व संप्रदायांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संतांनी नेहमीच सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवला होता दुर्दैवाने सर्वसामान्य समाज मात्र संतांच्या चमत्कारांकडे जास्त आकर्षित झाला टाळकुटेपणा करून काहीही होत नाही या संतांनी जे प्रचंड लिखाण करून ठेवले आहे त्याच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातूनच मानवी समाज योग्य दिशेने मार्गक्रमण करू शकेल,असेही प्रा साळुंखे म्हणाले
संत ज्ञानेश्वर त्यांची सर्व भावंडे,संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास आणि सर्वच संतांनी महाराष्ट्राच्या सामाजिक भावनेला सुरक्षित करण्याचे काम केले असेही यावेळी श्रीधर साळुंखे यांनी सांगितले

कोल्हापूर येथील कण्हेरी मठातील काडसिद्धेश्वर महाराजांच्या मठाचा आणि तेथील विविध सामाजिक कामांचा उल्लेख करून प्राध्यापक श्रीधर साळुंखे यांनी आधुनिक काळामध्ये सुद्धा संत सामाजिक कार्यामध्ये महत्वाचे योगदान देत आहेत आणि हि अध्यात्मिक लोकशाही बळकट करत आहेत असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन साठे यांनी केले
अरुण राजहंस यांनी आभार मानले
यावेळी ज्ञानविकास मंडळाचे प्रसाद चाफेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले
