सिंधू-अचंता यांनी केले भारताचे नेतृत्व


 

पॅरिस ऑलिम्पिकचे रंगतदार सोहळ्यात उदघाटन
पॅरिस
जगाचे लक्ष लागून राहिलेल्या २०२४ पॅरिस ऑलिम्पिक क्रीडोत्सावाला पॅरिस येथे सुरुवात झाली. नेहमीच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या परंपरेला छेद देत पहिल्यांदाच स्टेडियमऐवजी नदीच्या पात्रात हा उद्घाटन सोहळा पार पडला.सुमारे चार तास पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा चालला. ९५ बोटींतून ६,५०० हून अधिक खेळाडूंनी यामध्ये भाग घेतला. भारताचे ध्वज वाहक पीव्ही सिंधू आणि अंचता शरत कमल होते. उद्घाटन समारंभात भारतीय दलातील ७८ खेळाडू सहभागी झाले होते. परेडमध्ये सहभागी झालेल्या देशांमध्ये भारत ८४ व्या क्रमांकावर होता.

Advertisement

शनिवारी होणाऱ्या स्पर्धेमुळे भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी उद्घाटन सोहळ्यात सहभाग घेतला नाही. ध्वजवाहक सिंधू आणि शरथ कमल व्यतिरिक्त, इतर महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये तिरंदाज दीपिका कुमारी, बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा उद्घाटन समारंभात होते. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या उद्घाटन सोहळ्याने अधिकृतपणे सुरुवात झाली. फ्रान्सची सर्वात प्रसिद्ध ट्रॅक ॲथलीट मेरी-जोस पेरेक आणि तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती ज्युडोका टेडी रिनर यांनी शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकची मशाल संयुक्तपणे प्रज्वलित केली.

ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा मैदानाबाहेर आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ होती. चार तास चाललेल्या या सोहळ्यात अनेक कलाकारांनी भाग घेतला. पॉप स्टार लेडी गागा, अया नाकामुका यांसारखे सुपरस्टार परफॉर्म करताना दिसले. त्याच वेळी, सहा किलोमीटर लांबीच्या परेड ऑफ नेशन्समध्ये २०६ देशांतील ६५०० हून अधिक खेळाडूंनी ९४ बोटींमध्ये भाग घेतला.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!