नगर वाचनालयात शारदीय व्याख्यानमाला


१३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर विविध कार्यक्रम
सातारा
येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज [थोरले] नगर वाचनालयातर्फे श्री ल ना उर्फ दादा वाडीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शारदीय व्याख्यानमाला आयोजित केली आहे १३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत नगर वाचनालय पाठक हॉल येथे सायंकाळी ६ वाजता ही व्याख्याने होणार आहेत
१३ ऑक्टोबर रोजी भावार्थ देखणे यांचे लोकसाहित्य आणि प्रबोधन या विषयावर व्याख्यान होणार आहे १४ ऑक्टोबर रोजी बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या लेखिका इंदुमती जोंधळे यांचे माझा जीवनप्रवास या विषयावर व्याख्यान होणार आहे १५ ऑक्टोबर रोजी डॉ आदिती काळमेख आणि सहकाऱ्यांचा चौघीजणी प्रस्तुत मराठी काव्यसरितेतील नवदुर्गा हा कार्यक्रम होणार आहे १६ ऑक्टोबर रोजी पदमाकर पाठकजी यांचा राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जिना यहाँ मरना यहाँ हा दृकश्राव्य कार्यक्रम होणार आहे
या व्याख्यानमालेचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन अजित कुबेर,अतुल दोषी,अनंतराव जोशी यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!