मौनाचं कुलूप ‘ला मातृस्मृती पुरस्कार प्रदान


सातारा

Advertisement

श्री कामेश्वरी साहित्य मंडळ कामेरी व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा ईश्वरपुर जिल्हा सांगली आयोजित चौथ्या थे मातृस्मृती ग्रामीण संमेलनामध्ये साहित्यिक डॉ राजेंद्र माने यांच्या ‘मौनाचं कुलूप ‘ या कथासंग्रहास मातृस्मृती साहित्य पुरस्कारज्येष्ठ साहित्यिक व ९९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आला .
यावेळी कामेश्वरी साहित्य मंडळाचे अध्यक्ष साहित्यिक दि. बा .पाटील,संमेलनाचे स्वागताध्यक्ष शामरावआण्णा पाटील, उद्घाटक डॉ श्रीकांत पाटील उपस्थित होते.
याच संमेलनात किरण भावसार ,डॉक्टर संध्या देशपांडे,डॉक्टर विनय बापट,डॉक्टर स्मिता पाटील,शाहीर शाहिद खेरटकर यांच्या ग्रंथांनाही मातृ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आले.याच वेळी साहित्यिक रंगराव बापू पाटील व साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना विश्वास पाटील म्हणाले ‘ग्रामीण भागातील अशा साहित्य संमेलनांमुळे अनेक साहित्यिक लिहिते झाले आहेत.मराठी भाषा वृद्धिंगत होण्यासाठी व टिकण्यासाठी आपल्या मुलांना नातवंडांना मराठी माध्यमांच्या शाळेत घालणे गरजेचे आहे.कामेरी गाव हे लेखकांचे गाव आहे या गावामध्ये जवळपास साठ लेखक आहेत. दि. बा. पाटील आयोजित करत असणारे हे संमेलन लेखकांना प्रेरणा देणारे आहे . ‘
यापूर्वी मौनाचं कुलूप या कथासंग्रहात राजगुरुनगर येथिल संमेलनात कथाकार शंकर पाटील स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे.
यावेळी कवी धनाजी घोरपडे,चंद्रकांत पोतदार, लता ऐवळे, प्रा श्रीधर साळुंखे, डॉ मोहन सुखटणकर, रघुराज मेटकरी रमजान मुल्ला , हिम्मत पाटील वगैरे मान्यवर उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!