रविवारी मेरी आवाज ही पहचान है गाण्यांचा कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था व गोल्डन इरा यांचे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि गोल्डन इरा म्युझिकल ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मेरी आवाजही पहचान है हा जुना हिंदी मराठी मिक्स गाण्यांचा बहारदार कार्यक्रम रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे सादर केला जाणार आहे
Advertisement
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर निर्मोही फडके, नीलाक्षी काळे, सविता कुरुंदवाडे ,शिरीष चिटणीस, मुकुंद फडके उपस्थित राहणार आहेत
यावेळी अपर्णा गायकवाड, प्रवीण जांभळे आणि शामल काकडे हे गायक कलाकार विविध गाणी सादर करणार आहेत
सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

