अभिनेते सयाजी शिंदे राष्ट्रवादीत


अजित पवारांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
मुंबई
मराठी तसेच हिंदी आणि दक्षिणेमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.अजित पवार यांच्याहस्ते सयाजी शिंदे यांनी हाती बंधन बांधलं.
सयाजी शिंदे गेली अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. अनेक वर्ष सयाजी शिंदे राजकारणात उतरतील अशा चर्चा होत्या. अखेर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.
सयाजी शिंदे आजवर अनेक सामाजिक कार्यात सक्रीय असलेले पाहायला मिळाले आहेत. पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी त्यांनी सह्याद्री देवराई उपक्रम हाती घेत लाखो झाडे लावली आहेत. राजकारणावरही ते अनेकदा टिप्पणी करताना दिसलेत. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा यासारखे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सिनेमातही त्यांनी काम केलं आहे.
सयाजी शिंदे यांच्याआधी काही मराठी कलाकारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अभिनेते विजय पाटकर आणि असित रेडीज हे अजित पवार गट सांस्कृतिक विभागासाठी काम करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!