ब्राह्मण महासंघातर्फे अमित कुलकर्णी यांचा सत्कार


परशुराम विकास महामंडळाबद्दल सरकारचेही आभार
सातारा
अखिल ब्राह्मण महासंघाच्या विशेष बैठकीमध्ये डॉ होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती झाल्याबद्दल हिंदवी ग्रुपचे अमित कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला या बैठकीमध्ये ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही आभार मानण्यात आले
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली सातारा शहरातील शिक्षण क्षेत्राशी निगडित असणारे सामाजिक व्यक्तिमत्व अमित कुलकर्णी यांची नुकतीच मुंबई येथील डॉ होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती झाली आहे त्याबद्दल त्यांचा यावेळी धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

Advertisement


सत्काराला उत्तर देताना अमित कुलकर्णी यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात कोणते बदल होणार आहेत याचा आढावा घेतला भारतीय संस्कार नवीन शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शिकवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले ब्राह्मण महासंघाच्या सर्व उपक्रमांना आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले
यावेळी परशुराम ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आल्याबद्दल राज्य सरकारचेही अभिनंदन करून आभार मानणारा ठराव संमत करण्यात आला
ब्राह्मण महासंघातर्फे 27 ऑक्टोबर रोजी शाहू कला मंदिर येथे चारुदत्त आफळे यांचा सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याचे नियोजन करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली हा कार्यक्रम ब्राह्मण महासंघाने जरी आयोजित केला असला समाजातील सर्व घटकांसाठी तो खुला असून 27 ऑक्टोबर रोजी सर्व सावरकर प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले
या बैठकीला अध्यक्ष धनंजय कुलकर्णी उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराम देव सचिव भास्कर महिंदळे महेश कुलकर्णी मुकुंद फडके सायली मुतालिक राजवीर माजगावकर श्रीकांत वेलणकर, संचालक आणि समाज बांधव उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!