अखेर खड्डयातुन ट्रक बाहेर


पुणे शहरातील आश्चर्यकारक घटना
पुणे
पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आज शहरातील समाधान चौक परिसरात भल्या मोठ्या भगदाडात अख्खा ट्रक गाडला गेला आहे. रात्री ८ च्या सुमारास २ क्रेनच्या साहाय्याने हा तर्क बाहेर काढण्यात आला या ट्रकसह दोन दुचाकी देखील या खड्ड्यात कोसळल्याचे आहेत
ट्रक मागे घेत असताना पेव्हर ब्लॉक खचून ४० ते ५० फूट खोल खड्ड्यात हा ट्रक कोसळला. घटनेनंतर अग्निशामक दलाचे जवान तातडीने पोहोचले पण संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या घटनेचे दृश्य तेथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेचा हा ट्रक काही सामान घेऊन समाधान चौकात आला होता. जिथे दुरुस्तीचं काम सुरू होतं. ट्रक जेव्हा तिथे आला त्यावेळी तेथील पेव्हर ब्लॉक खचले आणि संपूर्ण ट्रक खड्ड्यात गाडला गेला.चालकाने सुदैवाने उडी मारल्याने तो बचावला
या ठिकाणी पूर्वी विहीर असल्याच्या दावा पुणे महानगरपालिका आयुक्तांनी केला आहे या विहिरीवरच हा रास्ता आणि त्यावर पेव्हर ब्लॉक होते ट्रकच्या वजनाने हा भाग खचला
घटनेनंतर ४ तासांनी क्रेन आल्यावर ट्रक बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु झाली २ करेनच वापर करून अखेर ट्रक बाहेर काढण्यात आला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!