सायबर सुरक्षेवर प्रबोधनात्मक नाट्य सादरीकरण


कोरेगावात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांसमोर जनजागृती

सातारा
क्विक हिल फाउंडेशन आणि कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने डि. पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव येथे सायबर सुरक्षेवरील विशेष प्रबोधनात्मक नाट्य सादर करण्यात आले.
या नाट्य सादरीकरणामध्ये सायबर गुन्हेगारी, सोशल मीडिया फसवणूक, सोशल इंजिनीयरिंग, आणि डिजिटल सुरक्षितता यांसारख्या विषयांवर प्रभावी प्रबोधन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उदाहरणांद्वारे सायबर सुरक्षेबाबत सजगतेचा संदेश दिला.हे सादरीकरण सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांपुढे करण्यात आले. उपस्थितांना सायबर धोके आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना याविषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास डि. पी. भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. कदम आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. टी. एम. चौगुले हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत सायबर जागरूकतेसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या उपक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ. बी. एस. सावंत यांनी विशेष पुढाकार घेतला आणि महत्वपूर्ण सहकार्य दिले. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे हा उपक्रम प्रभावीपणे राबवता आला.

Advertisement

कार्यक्रमाचे आयोजन कॉम्प्युटर विभाग प्रमुख डॉ. आर. डी. कुंभार आणि प्रा. पी. ए. लोखंडे यांच्या सहकार्याने करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!