महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार?
टाईम्स नाऊ आणि मॅट्रिझच्या सर्व्हेमधील निष्कर्ष
मुंबई
महाराष्ट्रात अवघ्या दोन-तीन महिन्यात विधानसभा निवडणुका आल्याने सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. आता एक ओपनियन पोल समोर आला आहे. या पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार आहे.
टाईम्स नाऊ आणि मॅट्रिझनं एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत तगडी फाईट होण्याची शक्यता आहे. विधानसभेत महायुतीला 137-152 अशा जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 129-144 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 145 चा आकडा गरजेचा आहे. त्यामुळे ओपिनियन पोलमधील अंदाजानुसार महायुती सहजरीत्या महाराष्ट्रात पुन्हा सरकार बनवता दिसतेय.
महायुती : 137-152
महाविकास आघआडी : 129-144
इतर : 03-08
टाईम्स नाऊ आणि मॅट्रिझच्या अंदाजानुसार राज्यात भाजप 26.2 टक्के वोट शेअरसह 83 ते 93 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या ओपनियन पोलनुसार विधानसभेत भाजप महाराष्ट्रात मोठा भाऊ ठरताना दिसतोय. लोकसभेत काँग्रेस महाराष्ट्रात मोठा भाऊ ठरला होता. आता विधासभेत हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. भाजपचा घटकपक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना 6.8 टक्के वोट शेअरसह 42-52 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी 2.8 टक्के वोट शेअरसह 07-12 जागा जिंकण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
टाईम्स नाऊ आणि मॅट्रिझच्या अंदाजानुसार लोकसभेत महाराष्ट्रात मोठा भाऊ ठरलेला काँग्रेस विधानसभेत ठाकरे आणि पवारांपेक्षा जास्त जागा जिंकताना दिसतोय. काँग्रेस 16.2 टक्के वोट शेअरसह 58-68 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर ठाकरेंची शिवसेना 14.2 टक्के वोट शेअरसह 26-31 जिंकण्याची शक्यता आहे. आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10.1 टक्के वोट शेअरसह 03-08 जागा जिंकण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
पक्ष वोट शेअर जागा
भाजप 26.2 टक्के 83-93
शिवसेना (एकनाथ शिंदे) 6.8 टक्के 42-52
राष्ट्रवादी (अजित पवार) 2.8 टक्के 07-12
काँग्रेस 16.2 टक्के 58-68
शिवसेना (UBT) 14.2 टक्के 26-31
राष्ट्रवादी (शरद पवार) 13.7टक्के 35-45
इतर 10.1 टक्के 03-08
राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 145 चा आकडा गरजेचा आहे. त्यामुळे ओपिनियन पोलमधील अंदाजानुसार विधानसभेत महायुतीला 137-152 अशा जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 129-144 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती राज्यात सरकार स्थापण करण्याचा अंदाज या पोलमधून व्यक्त होतोय.

