बी.बी.ए, बी.सी.ए.प्रवेशप्रक्रिया अर्जाची ऑनलाईन नोंदणी सुरू
सातारा
या शैक्षणिक वर्षापासून एआयसीटीई नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने तंत्रशिक्षण संचालनालयाने सीईटी प्रक्रियेद्वारे इंजिनिअरींगप्रमाणे बीबीए व बीसीए या पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपरीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी सीईटी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली असून सर्व विद्यार्थ्यांनी दि. ६ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.१ ते ९ सप्टेंबर या कालावधीत मुळ कागदपत्रांची पडताळणी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे करून अर्ज निश्चित करणे आवश्यक आहे. सोळा सप्टेंबर रोजी अंतिम निवड यादी जाहीर होणार आहे
बीबीए व बीसीए या अभ्यासक्रमास व्यवसायिक पदवीचा दर्जा मिळाल्याने शासनाच्या प्रवेश प्रक्रियेतून प्रवेशीत होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती मिळणार आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपरीक्षा दिली आहे अशा इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज नोंदणी सुविधा कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, वर्ये येथे उपलब्ध आहे तरी इच्छुकांनी आपली सर्व मुळ कागदपत्रासह प्रवेश कक्षात येऊन ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी असे आवाहन इन्स्टिट्युटचे संचालक डॉ बी एस सावंत यांनी केले.

