शनिवारी हे चिंचेचे झाड संगीत कार्यक्रम
आधुनिक वाल्मिकी ग दि माडगुळकर यांचे पुण्यस्मरण
सातारा
आधुनिक काळातील वाल्मिकी म्हणजेच गीतकार कवी ग दि माडगुळकर यांचे पुण्यस्मरण करण्यासाठी आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी मर्यादित, यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहात हे चिंचेचे झाड या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके आणि दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे उपस्थित राहणार आहेत
कार्यक्रमाची संकल्पना प्रदीप देसाई यांची असून तेच निवेदन करणार आहेत यावेळी डॉक्टर सुनील पटवर्धन आणि सौ विभावरी गोडबोले हे गदिमांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉक्टर संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस,विनोद कुलकर्णी आणि श्रीराम नानल यांनी केले आहे.

