ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन
कर्करोगाशी झुंज अपयशी
मुंबई
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झाले मागील एक ते दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी सामना करत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली.विजय कदम यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भुमिका निभावल्या होत्या. त्यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 1980-90च्या दशकात विजय कदम यांनी अनेक दमदार सिनेमात काम केलं. प्रमुख कॉमेडी हिरो म्हणून त्यांनी केलं आहे. मराठीतील एक हरहुन्नरी अभिनेता अशी त्यांची ओळख होती.
मराठी सिनेमेच नाही विजय कदम यांनी मराठी रंगभूमी देखील गाजवली. अनेक हिट मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. टूरटूर, सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे ही त्यांची अत्यंत गाजलेली नाटकं आहेत. ती परत आलीये ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी बाबुराव तांडेल ही भुमिका साकारली होती. या मालिकेत अनेक वर्षांनी विजय कदम प्रेक्षकांसमोर आले होते.
