श्रीब्रह्मेंद्रस्वामी पुण्यतिथी महोत्सव सोमवारपासून
सातारा
श्री क्षेत्र धावडशी येथे प्रतिवर्षी प्रमाणे श्रीब्रह्मेंद्रस्वामी यांचा पुण्यतिथी महोत्सव श्रावण शु ।। प्रतिपदा सोमवार ५ ऑगस्ट २०२४ ते श्रावण शु ।। नवमी १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत संपन्न होणार आहे.
श्रावण शु ।। प्रतिपदा म्हणजे सोमवार ५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६.३० वाजता धावडशी येथून स्वामींच्या पादुकांचे प्रस्थान पालखी सोहळा धावडशी-विरमाडे-धावडशी असा पायी पालखी सोहळा मार्गस्थ होईल. तसेच या उत्सव काळात दररोज संध्याकाळी सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच श्रावण शु ।। नवमी म्हणजे १४ ऑगस्ट २०२४ ला सकाळी ६.३० वाजता धावडशी येथून स्वामींच्या पादुकांचे प्रस्थान पालखी सोहळा धावडशी विरमाडे धावडशी असा सांगता सोहळा होईल.
Advertisement
या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी देवेंद्र तांबे, धावडशी [9890343802] यांचेकडे संपर्क साधावा
