केंद्रप्रमुखपदी नारायण बागल
सातारा
सातारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे नुकतीच केंद्रप्रमुख पदासाठी पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे.सोनापूर (ता. सातारा ) गावचे सुपुत्र नारायण वामन बागल यांना पाटण तालुक्यात केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती दिलेली आहे.त्यानी अनेक दुर्गम भागातील शाळेत काम केलेले आहे. ते एक विद्यार्थीप्रिय व तंत्रस्नेही शिक्षक आहेत. केंद्रप्रमुख म्हणून ते स्वकर्तृत्वाने प्राथमिक शाळांचा गुणात्मक व संख्यात्मक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करतील.त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
