स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक
प्रशिक्षक दीपाली देशपांडे या आईसारख्याच असल्याची भावना
पॅरिस
पॅरिस ऑलिंपिकमध्ये 50 मीटर एयर रायफल नेमबाजीच्या फायनलमध्ये भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं आहे. कोल्हापूरच्या स्वप्नीलने भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये तिसरं पदक मिळवून दिलं आहे.भारताला पहिल्यांदाच नेमबाजीमध्ये तीन पदकं मिळाली आहेत.
50 मीटर एयर रायफल नेमबाजीमध्ये चीनच्या नेमबाजाला सुवर्णपदक तर, युक्रेनच्या नेमबाजाला रौप्यपदक मिळालं, तर तिसऱ्या क्रमांकावर राहत स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं.या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या स्वप्नीलने यापूर्वी 2022 साली एशियन गेम्समध्ये स्वप्निलनं सांघिक सुवर्णपदक मिळवलं होतं.

या स्पर्धेनंतर बोलताना स्वप्नीलनं त्याच्या प्रशिक्षकांचे विशेष आभार मानले आहेत. कोणत्याही प्रकारच्या दडपणाचा विचार न करता संयम ठेवत ही कामगिरी फत्ते केल्याचं स्वप्नील म्हणाला.कांस्यपदक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना स्वप्नील कुसाळेनं या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे. फायनलमध्ये शूट करताना दबाव हा असतोच पण मी श्वासावर नियंत्रण ठेवलं आणि संयम ठेवत शूट करत राहिलो, असं स्वप्नील म्हणाला. मागच्या कामगिरीचा फार विचार न करता शांत राहून शूट करण्यावर लक्ष दिल्याचं त्यानं सांगितलं.
महाराष्ट्राला आधीच्या नेमबाजांना पदक मिळालं नसलं तरी ते सगळे मोठे खेळाडू आहेत. मला पदक मिळालं असलं तरी त्यानं त्यांचा मोठेपणा कमी होत नाही, असंही स्वप्नील म्हणाला.
स्वप्नील कोच दीपाली देशपांडे यांच्याबद्दल अगदी भरभरून बोलला.”यापूर्वी मी पात्र झालो नव्हतो. त्यानंतर प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांची मोठी मदत झाली. मला मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी त्यांची खूप मदत झाली. त्या माझ्या दुसऱ्या आईसारख्या आहेत. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे,” असं स्वप्नीलनं म्हटलं
