कोयना धरणातून 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग


क्युसेक आणि टीएमसी या शब्दांचा अर्थ काय

सातारा
महाराष्ट्रामध्ये आज म्हणजेच 26 जुलै रोजी अनेक ठिकाणी जोरदार ते मध्य स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.आज सकाळीच कोयना धरणातून 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग वाढवला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणांमधील पाणीसाठा आणि विसर्ग यावर लक्ष ठेऊन असल्याचं म्हटलं आहे.

Advertisement

दर पावसळ्यामध्ये ऐकायला मिळणारा क्युसेक हा शब्द वाहतं द्रव्य मोजण्यासाठी केला जातो. आता एक क्युसेक म्हणजे किती असा प्रश्न पडला असेल तर 1 क्युसेक पाणी म्हणजे दर सेकंदाला 28.32 लिटर पाणी असा होतो. म्हणजेच 2 क्युसेक पाणी सोडलं असं म्हटलं तर दर सेकंदाला 56.64 (28.32X2) लिटर पाणी सोडण्यात आलं. क्युसेक हा शब्द क्युब पर सेकेण्ड्स वरुन आला आहे. प्रत्येक सेकंदाला किती क्युब पाणी सोडलं जातं हे यामधून समजतं.म्हणजेच आता कोयना धरणातून 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला याचा अर्थ लिटरमध्ये काढायचा झाला तर 28.32X32100 म्हणजेच सेकंदाला 9 लाख 9 हजार 72 लिटर पाणी धरणामधून सोडलं जात आहे.
टीएमसीचा फुलफॉर्म थाउझंड मिलियन कुबीक फिट असा होतो. आता एक टीएमसी पाणी म्हणजे किती असं वाचालं तर 1 टीएमसी म्हणजे 2,831 कोटी लिटर इतकं पाणी होतं. सामान्यपणे भारतामध्ये धरणांमधील पाण्याची क्षमता किंवा नदीमधून वाहणारं पाणी मोजण्यासाठी हे मोठं एकक वापरलं जातं. भारत सरकारचा केंद्रीय जल आयोगाकडून धरणांमधील पाणीसाठा मोजण्यासाठी हेच एकक वापरलं जातं. ही केंद्रीय संस्था असल्याने देशभरामध्ये धरणांमधील पाणी या एकाच एककाने मोजलं जातं. कृषी तज्ञांच्या सांगण्यानुसार एक टीएमसी पाण्यामध्ये 10 हजार एकर जमीनीला 1 वर्ष सिंचनासाठी पाणी पुरवठा करता येईल. काही दिवसांपूर्वी कोयना धरणामधील पाणीसाठा 60.42 टीएमसी इतका होता. म्हणजेच तेव्हा 171049 कोटी लीटर पाणी कोयना धरणात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!