भारतातल्या क्रिप्‍टो एक्‍सचेंजवर सायबर हल्ला


तब्बल 1900 कोटींची क्रिप्‍टोकरन्सी गायब

मुंबई
क्रिप्टो करन्सी हे पैसे कमावण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून नावा रुपाला येत आहे. पण क्रिप्टो करंसीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिप्टो करंसी एक्सचेंज वजीर एक्सवर मोठा सायबर हल्ला झाला आहे.हॅकर्सनी मोठा डल्ला मारला असून एक्सचेंज वॉलेटमधून $230 कोटी डॉलर म्हणजेच 1,923 कोटींची डिजिटल मालमत्ता चोरी केली आहे. मल्टीसिग वॉलेटमधील एक सुरक्षा भंग झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.वझीर एक्सवर झालेला हा हल्ला भारतीय क्रिप्टो बिझनेससाठी मोठा झटका आहे. यामुळे क्रिप्टो एक्सचेंजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी युझर्सची चिंता वाढली आहे.
भारतीय क्रिप्टो करंसी एक्सचेंज वजीर एक्सवर झालेल्या या सायबर हल्ल्याच्या मागे उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर या विरोधात तत्काळ कारवाई करण्यात आली असून भारतीय रुपये आणि क्रिप्टोकरन्सी काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चोरी झालेल्या क्रिप्टोकरन्सींमध्ये शिबू इनूचा सर्वाधिक समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
वझीर एक्सनं X वर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात लिहिलंय, “आमच्या मल्टीसिग वॉलेटपैकी एकाची सुरक्षा भंग झाली आहे. आमची टीम याचा योग्य तपास करत आहे. तुमच्या मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रुपया आणि क्रिप्टो काढणं तात्पुरतं थांबवलं जाईल. तुम्ही दाखवलेला संयम आणि समजून घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू”.

Advertisement

कॉईन डीसीएक्सचे सह-संस्थापक नीरज खंडेलवाल यांनी या सायबर हल्ल्यावर प्रतिक्रिया देत म्हटलं आही की, वझीर एक्स ही भारतीय मार्केटमध्ये आमची प्रति स्पर्धक असली तरी या घटनेबद्दल मला वाईट वाटत आहे. भारतीय वेब इकोसिस्टमसाठी ही बातमी चांगली नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!