शरद पवार यांच्या गटाला मान्यता


केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला लोकसभा निवडणुकीत वापरलेलं तुतारी चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीसही वापरण्यास मान्यता मिळाली आहे.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाचं आता तेच चिन्हं असणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे. निवडणूक आयोगाने तशी अधिकृत मान्यताच आज पक्षाला दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता कलम 29 ब नुसार देणगी स्वीकारता येणार आहे. यापुढे शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारण्यासाठी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगासमोर आज याबाबत सुनावणी पार पडली. या सुनावणीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला देणगी स्वीकारण्यास मान्यता मिळाली आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा आहे.
निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या “आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या. शरद पवार यांचा पक्ष ज्याप्रकारे काढून घेण्यात आला, पण जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल आभार. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं. पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता. तसेच टॅक्स बॅनेफिट मिळत नव्हता. तर आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे दुसरी एक मागणी चिन्हातील कन्फ्युजनबद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथे असेल तिथे दुसरं तुतारी हे चिन्ह नको आणि असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये ही विनंती केली आहे. आयोग म्हणालं त्यावर आम्ही अभ्यास करू”,

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!