23 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प


होऊ शकतात अनेक मोठ्या घोषणा
नवी दिल्ली
तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या २३ जुलैला अर्थसंकल्प मांडणार आहेत.यावेळी मोदी सरकार कोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान २२ जुलैपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे.मोदी सरकार तिसऱ्या टर्ममधील पहिल्या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला करात सूट देईल अशी शक्यता आहे. एलपीजी सबसिडी सुरू करणे, विविध वस्तूंवरील कर कमी करणे, शेतकऱ्यांच्या निधीत ६००० वरून वर्षाला ८००० रुपयांची वाढ, आदी घोषणा अर्थसंकल्पात होऊ शकतात.
याशिवाय ग्रामीण आवास योजनेतील राज्यांचा वाटा ५० टक्क्यांनी वाढविण्यात येईल, असे म्हटले जात आहे. दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सलग सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!