नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम
२५ जून ते २५ जुलै या कालावधीत मोहीम
सातारा
ज्या नागरिकांचे 18 वर्ष पूर्ण झाले आहे किंवा ज्यांचे नाव गहाळ झाले आहे त्यांनी तातडीने नावनोंदणी करण्यासाठी नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु झाला आहे २५ जून ते २५ जुलै या कालावधीत हा कार्यक्रम सुरु रहाणार आहे
या दरम्यान मतदारांसाठी नवीन नाव नोंदणी, नाव व पत्ता दुरुस्ती, फोटो बदलणे, मतदारसंघ बदलणे, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, मोबाईल नंबर अपडेट आधारशी लिंक करणे, नवीन वोटर आयडी बनवणे या सर्व प्रकारच्या नोंदणी करण्याची मोहिम पुन्हा सुरु झाली आहे.
खालील ऍपवर क्लिक करून अधिक माहिती मिळू शकते
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen&pcampaignid=web_share
नविन नाव नोंदणीसाठी फॉर्म-6,आधार कार्ड हे मतदार कार्डला जोडण्यासाठी फॉर्म- 6B,नाव कमी करण्यासाठी फॉर्म 7,नाव दुरुस्ती, वय, पत्ता यातील चुक दुरुस्तीसाठ फॉर्म-8 वापरता येतो
अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 1)पासपोर्ट साईज एक फोटो 2)ओळखप्रत्रः पॅनकार्ड,जन्माचा दाखला, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स…(यापैकी एक)3)रहिवासी पुरावा- आधार कार्ड, पासपोर्ट कॉपी, वीज बील, मालमत्ता कर पावती,बॅंक पासबुक (यापैकी एक)
प्रत्येक बूथ वर कमीतकमी 50 नवमतदार नोंदवावेत , आपल्या बूथ वरील बोगस मतदार, मयत मतदार , बदली होवून गेलेले मतदार कमी करण्यासाठी त्यांची माहिती आपल्या बूथ च्या बी एल ओ यांना सांगावी आणि मतदार कमी करून घ्यावेत आत्ताच्या लोकसभा निवडणुकी वेळी ज्यांना मतदार कार्ड असूनही मतदान करता आले नाही त्यांची नावे पुन्हा नोंदणी करून घ्यावीत असे आवाहान सुर्यकांत (राजू) द. गोरे यांनी केले असून काही शंका असल्यास 9823073473 या क्रमांकावर संपर्क साधावा
