अक्षर पटेलने घेतला अप्रतिम झेल


भारताच्या विजयात मोठा हातभार
सेंट लुसिया
टी-२० विश्वचषक २०२४ च्या ५१ व्या सामन्यात भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला.या सामन्यात अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा अप्रतिम झेल घेतला. त्याच्या या झेलचे सर्वत्र कौतुक होत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे.ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान रोहित शर्माने डावातील ९वे षटक कुलदीप यादवकडे सोपवले. या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या अक्षर पटेलने एका हातात अप्रतिम झेल घेत सर्वांनाच चकित केले. मार्शला तो बाद झाला यावर विश्वासच बसत नव्हता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मार्श २८ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने भारताला मोठे यश मिळवून दिले. याआधी मार्शला जीवदानाच्या दोन संधी मिळाल्या होत्या. ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांनी आपल्या कॅच सोडले होते
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव केला आहे. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या उपांत्य फेरीतील आशांना मोठा धक्का बसला आहे. प्रथम खेळताना भारतीय संघाने २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ १८१ धावाच करू शकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने फलंदाजीत कमाल केली. हिटमॅनने अवघ्या ४१ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. गोलंदाजीत अर्शदीप सिंगने ३ बळी घेतले. याशिवाय कुलदीप यादवने चार षटकांत २४ धावा देत दोन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक ७६ धावा केल्या. तर कर्णधार मिचेल मार्शने ३७ धावांची खेळी केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!