आध्यात्मिक लेखन स्पर्धा २०२४


माझे हृदयस्थ श्रीगुरू या याविषयावर लेखन पाठवा

पुणे
गुरु पूर्णिमेच्या पावन दिनाचे औचित्य साधून एस फोर सोल्शूयन्स, प्रकाशनगृह यांनी “आध्यात्मिक लेखन स्पर्धा २०२४”; आयोजित केली आहे
आपल्या आत्मिक, आध्यात्मिक प्रवासात मार्गदर्शन करणारे गुरु कोण आहेत, त्यांचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडला आहे, या विषयावर मराठीमध्ये मूळ आणि अप्रकाशित लेख लिहून पाठवणे अभिप्रेत आहे.

स्पर्धेचे नियम नियम व अटी: लेखन हे स्वतःचे युनिकोडमध्ये टाईपिंग करुन लिहिलेले आणि अप्रकाशित असावे लेखन कमीत कमी १२०० शब्दांचे असावे आपले लेखन १० जुलै २०२४ पर्यंत एस फोर सोल्युशन्स, प्रकाशनगृहाच्या ईमेलवर (sfours1106@gmail.com) पाठवावे लेखन पीडीएफ (PDF) स्वरूपातच पाठवावे, इतर स्वरूपात आलेले लेखन स्पर्धेसाठी स्वीकारले जाणार नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी सहभागी व्यक्तीचा प्रोफाईल फोटो (जेपीईजी – JPEG किंवा पीएनजी – PNG स्वरूपात) आणि लेखन (पीडीएफ – PDF स्वरूपात) तसेच वैयक्तिक माहिती / बायोडाटा सर्व एकत्रितपणे ईमेलने पाठवावे

Advertisement

पुरस्कार व संबधित माहिती:निवडक २५ लेखांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे संपादकीय सदस्य आणि मजकूर विकास सल्लागार सदस्यांच्या निर्णयानुसार तिसऱ्या आठवड्यात स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.निवड झालेल्या केवळ २५ सहभागींना जुलै २०२४ अखेर ई-प्रमाणपत्र पाठवले जाईल ऑफलाइन सत्कार समारोहाच्या संदर्भात साधारणपणे जुलै २०२४ च्या अखेरीस सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल या सत्कार समारोहासाठी ई-प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या १० ते १२ सहभागींना निमंत्रित केले जाणार आहे. त्यावेळी सहभागींना आपले लेखन सादर करावे लागेल; त्याच दिवशी त्यानंतर सत्कार सोहळा संपन्न होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!