मेहंदी समारंभात नाचताना नवरीचा मृत्यू


लग्नाच्या एक दिवस आधीच भयंकर घटना
डेहरादून
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि अतिशय आनंदाचा दिवस असतो. नवरी आणि नवरदेव या दिवसाची आतुरतेनं वाट पाहात असतात. मात्र, कधीकधी ऐनवेळी असं काही घडलं, ज्यामुळे हे आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात बदलतं.नौकुचियाताल येथील एका रिसॉर्टमध्ये मेहंदी समारंभात स्टेजवर नृत्य करताना वधूचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत्यूचं कारणही स्पष्ट केलं आहे. कुटुंबीयांनी कोणतीही पोलीस कारवाई न करता वधूच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
भीमताल पोलीस स्टेशनचे प्रभारी जगदीप नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे रहिवासी डॉ. संजय कुमार जैन त्यांची 28 वर्षीय मुलगी श्रेया हिच्या लग्नासाठी नौकुचियाताल येथील एका रिसॉर्टमध्ये आले होते. रविवारी लग्न होणार होतं. शनिवारी सायंकाळी रिसॉर्टमध्ये मेहंदी सोहळा सुरू होता.स्टेजवर कुटुंबीय नाचत होते. ज्यामध्ये श्रेयाही होती. स्टेजवर डान्स करताना ती बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी तिला सीएचसीमध्ये नेलं, तिथे तिचा मृत्यू झाला. वधूला हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉ. डॉ. राशिद यांनी सांगितलं. कुटुंबाने कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!