आध्यात्मशास्त्रात नामसाधना सर्वात जास्त महत्वाची
ज्ञानयज्ञ कार्यक्रमात डॉक्टर सुभाष आगाशे यांचे प्रतिपादन
सातारा
आध्यात्मशास्त्रात नामसाधना सर्वात जास्त महत्वाची आहे ईश्वराची भक्ती करण्याचे अनेक मार्ग आहेत ध्यानधारणा नामसाधना आणि प्रार्थना यापैकी नामसाधना तुलनेने सोपी असल्याने सर्वसामान्यांसाठी नामसाधना महत्वाची आहे असे प्रतिपादन डॉ सुभाष आगाशे यांनी केले
बाळासाहेब शिवदे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये अंतिम पुष्प ओवताना ते बोलत होते
डॉ सुभाष आगाशे म्हणाले,सर्वच संतांनी नामाचे महत्व अधोरेखित केले आहे त्यामुळे आधुनिक काळातील व्यस्त जीवनशैलीतही सर्वानी दररोज थोडा वेळ स्वतःसाठी बाजूला ठेवून नामसाधना करायला हवी स्वतःच्या अंतरंगातील ईश्वरापर्यंत पोहोचायचे असेल तर नामसाधना हि जीवनशैली बनली पाहिजे
डॉ सुभाष आगाशे यांनी यावेळी ध्यानधारणा आणि प्रार्थना याचे महत्वही विशद केले आपल्या श्वास आणि उच्छवास यामध्ये जो ईश्वर स्थित आहे त्याच्याशी संपर्क साधण्याचे काम ध्यानधारणेमुळे होऊ शकते तर ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मामध्ये प्रार्थनेचे महत्व आहे योग्य प्रकारे प्रार्थना करूनही ईश्वराचा अनुभव घेता येतो

गीता ज्ञानेश्वरी दासबोध हे ग्रंथ किंवा विविध संतांची वचने या माध्यमातून साधकाला मार्गदर्शन केले जाते या ग्रंथांचे मोल सर्वानी जाणायला हवे असेही डॉ सुभाष आगाशे म्हणाले अध्यात्त्म हा अनुभव घेण्याचा विषय आहे असेही त्यांनी स्पष्ट केले
यावेळी रवींद्र शिवदे यांनी त्यांचे वडील बाळासाहेब शिवदे यांच्या आठवणींना उजाळा दिला वडिलांच्या आशीवार्दमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे आम्ही जीवनात काहीतरी करून दाखवू शकलो असे त्यांनी सांगितले

यावेळी अंजली शिवदे ,नंदा कुलकर्णी शिवदे ,सुलभ डांगे बिडकर यांनीही बाळासाहेब शिवदे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या
उपस्थित श्रोत्यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी डॉ सुभाष आगाशे आणि शिवदे दाम्पत्य यांचे आभार मानले
रवींद्र शिवदे यांच्या पिरवाडी येथे श्रद्धा बंगल्यामध्ये ही प्रवचन माला सुरू होती
